विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

कोल्हापूर | विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे वडील नारायणराव नांगरे पाटील यांचं आज निधन दुपारी चार वाजता झालं आहे. त्यांचं वय 79 वर्ष होतं.

नारायणराव नांगरे पाटील यांच्यावर गेले 15 दिवस दवाखान्यात उपचार सुरु होते. त्यांचं मूळ गाव सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरुड हे आहे.

नारायणराव नांगरे पाटील हे राजकारणात सक्रीय होते, त्यांनी कोकरुड गावाचं सरपंचपद आणि शिराळा पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलं होतं. 

नारायणराव नांगरे पाटील यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विश्वास नांगरे पाटील यांच्या वाटचालीत त्यांच्या वडिलांचा महत्वाचा वाटा होता.

 महत्वाच्या बातम्या-

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी