बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘व्हॅलेंटाईन डे’ला आणखी काय हवं?; हॉटेलची भन्नाट ऑफर!!!

कॅनडा | ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीला सरप्राईज देण्याचा हा दिवस…! आपल्या मनातील साऱ्या भावना आपल्या जोडीदाराला सांगून मोकळं व्हायचं असा हा दिवस…. याच दिवसांचं औचित्य साधत कॅनडामधील एका हॉटेलने प्रेमी युगुलांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ला हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास पुढील 18 वर्ष स्टे मोफत मिळेल. हॉटेल झेड हे कॅनडामधल्या व्हिक्टोरिया आणि किलोन येथे आहेत. प्रेमी युगुलांसाठी असलेल्या या भन्नाट ऑफरचा हॉटेलने एक प्रोमोही प्रसिद्ध केला आहे.

जर कुणी बेबी प्लॅन करायला इच्छुक नसतील तर आम्ही काहीही करू शकत नाही. पण जर कुणी इच्छुक असेल तर आमच्या हॉटेलमध्ये अवश्य या. आमच्या हॉटेलमध्ये आपण प्रयत्न करू शकता. तुम्ही हॉटेलमध्ये राहत असताना गरोदर राहिलात तर पुढील 18 वर्ष हॉटेल स्टे तुम्हाला मोफत मिळेल, असं हॉटेलने प्रोमोमध्ये म्हटलं आहे.

अनेक प्रेमी युगुलं आपला व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशांनी या ऑफर्सचा विचार करायला हरकत नाही, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

डॅडींना पुन्हा सुट्टीवर जायचंय; जाणून घ्या कारण…

मोदींनी राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या- 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More