‘4 नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन तयार राहा’; राकेश टिकैत आक्रमक
नवी दिल्ली | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाने 26 जानेवारीनंतर नवीन वळण घेतलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक होऊन आंदोलन उठवण्याचा प्रयत्न केला. पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भावूक होऊन दिल्लीच्या बाॅडरवर जमण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर लाखो शेतकरी दिल्लीच्या बाॅडरवर जमा झाले. त्यानंतर आतापर्यंत राकेश टिकैत दिल्लीच्या बाॅडरवर तळ ठोकून बसले आहेत.
तब्बल 88 दिवस उलटले तरी या विषयावर कोणताही तोडगा निघाला नाही. आता मात्र राकेश टिकैत यांनी थेट संसदेला घेराव घालण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
कायदे रद्द न केल्यास थेट आता 4 नाही तर 40 लाख ट्रॅक्टर घेवून संसदेला घेराव घालण्याचा इशारा टिकैत यांनी सरकारला दिला आहे. संसद घेरावासाठी शेतकऱ्यांनी तयार रहावं. केव्हाही दिल्लीत येण्याचा आव्हान दिलं जाऊ शकतं, अशी सुचना देखील टिकैत यांनी दिली. राजस्थानातील सिकर येथे महापंचायतीमध्ये बोलत असताना त्यांनी हा इशारा दिला.
केंद्राने कान उघडून ऐकावं, शेतकरी इथेच आहेत आणि ट्रॅक्टर देखील इथेच आहेत. शेतकरी इंडिया गेटवर पेरणी करतील असा टोला टिकैत यांनी लगावला. या आंदोलनात शेतकरी आणि केंद्र सरकार दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत.
थोडक्यात बातम्या-
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर
…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा
प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं
संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे
Comments are closed.