बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाणी जपून वापरा! ‘या’ कारणाने पिंपरी-चिंचवडकरांना दोन दिवस मिळणार नाही पाणी

पुणे | गुरुवार (दि. 1 एप्रिल) रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. रावेतच्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात होणारा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरणातून पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो.  रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. त्यानंतर सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीची कामं, सेक्टर 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र, विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा विषयक नियमित दुरुस्तीची कामं, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामं करणे अत्यावश्यक आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केला जाईल. पण त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सगळ्या भागांचा संध्याकाळचा पाणीपुरवठा केल्या जाणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातील भागात शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलं आहे.

थोडक्यात बातम्या

मिठाच्या खड्यावरुन राजकारण तापलं; सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More