बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याच्या पापात आम्ही सुद्धा भागीदार”

औरंगाबाद | राज्यातील राजकारण महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच तापायला सुरूवात झाली आहे. राज्यातील प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणूका येणाऱ्या काळात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत. यात मुंबई आणि औरंगाबाद या दोन महत्वाच्या महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेना नेते दोन्ही राखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षात प्रचंड राजकीय स्पर्धा रंगलेली असते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना नेते यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्री यांचं तुतारी वाजवून उपहासात्मक स्वागत करणार असल्याचं खासदार जलील म्हणाले आहेत. यावरून शिवसेना नेते त्यांच्यावर चांगलेच शाब्दिक हल्ले करत आहेत.

राज्याचे रोजगार राज्यमंत्री आणि सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दूल सत्तार यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचं पाप आम्हीचं केलं आहे. असं सत्तार म्हणाले आहेत. आमचंच पाप आमच्यावर उलटत असेल तर शेवटचा तथास्तू मंत्र आमच्याकडे आहे. येणाऱ्या निवडणूकीत जनताच जलील यांना धडा शिकवणार आहे, अशा शब्दात सत्तार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला.

औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. खूप वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले होते. गत महानगरपालिकेत जलील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता. आता शिवसेना आणि जलील यांच्यात राजकीय युद्ध रंगलं आहे.

थोडक्यात बातम्या 

कोरोना काळात मी ‘या’ दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या- नितीन गडकरी

मोठी बातमी! मुंबईतील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला, दहाजण जखमी

धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, माहीकडे आता नवी जबाबदारी!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा आजचे दर एका क्लिकवर, आजही दरात घसरण

शिवसेना म्हणजे काय?, राहुल गांधींच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, फटे लेकीन…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More