बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकार पाडण्याचा नाही तर आम्ही दुसराच प्लॅन आखतोय, दानवेंनी भाजपचं सिक्रेट फोडलं!

नवी दिल्ली | केंद्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काहीच संबंध नाही. आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्ही 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

जनता 2024च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे. या सरकारमध्येच वाद आहेत. त्यामुळेच ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधीच केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असं वक्तव्य केलं नाही. गेल्या सहा महिन्यात तर नाहीच नाही, असं दानवे म्हणाले.

सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामुळे ठाकरे सरकार कोंडित सापडलंय. अशात भाजपने सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

फडणवीस, अमित शहांची गुप्त बैठक, नंतर मोदींशी चर्चा, ठाकरे सरकारवर अस्थिरतेचं ढग?

…तर महाराष्ट्रावर विरोधकांचे उपकार होतील- संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; मराठा आरक्षणासाठी सुचवला ‘हा’ उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More