बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात; मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू”

मुंबई | सध्या कोल्हापूरात मराठा क्रांती मुक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळू लागलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मला चावी दिली जाते, असं दानवे म्हणत आहे. खरंतर चावी द्यावीच लागते. दीड वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती. त्यामुळे तुमच्या सत्तेला टाळं लागलं. आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं. चावी आणि टाळं फार महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात. आमच्याकडे चावी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू, असं संजय राऊत म्हणाले.

दानवे आमचे मित्र आहेत, ते उत्तम विनोद करतात. चांगलं ग्रामीण नेतृत्व आहे, असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण असे पहिल्या टप्प्यात आंदोलन असणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर पुणे लालमहाल ते मुंबई विधान भवन लाँग मार्च होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

‘डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार करणार नाही’; आयएमएचा समाजकंटकांना इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More