पुणे | एल्गार परिषदेच हिंदू समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या शरजील उस्मानीला ‘एल्गार परिषद 2021’ च्या आयोजकांनी एका निवेदनाद्वारे पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या. कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक निवेदन दिलं आहे.
30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे. हिंदू समाद हत्या करतो. घरी जाऊन अंघोळ करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, असं वादग्रस्त वक्तव्य शरजील उस्मानीने केलं होतं. त्याच्यावर राजकीय नेत्यांनी उस्मानीवर जोरदार टीका केली होती.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं
“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या”
धावत्या ट्रेनमध्ये या मराठी अभिनेत्रीने छैया छैया गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ
‘बिग बॅास’ शो अर्धवट सोडल्यास स्पर्धकाला चुकवावी लागते ‘एवढी’ किंमत
“भाजपबरोबर जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत म्हणून…”
Comments are closed.