बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…”

मुंबई | दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला स्वतःचा बेड एका तरुणाला देत आपला त्याचा जीव वाचवला होता आणि त्यानंतर ३ दिवसातच त्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ही सर्व घटना नागपूरमध्ये घडली. त्यानंतर दाभाडकर यांच्या उदारतेचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं गेलं.

भाजप नेते अवधूत वाघ यांनी यासंदर्भात ट्विट करत ‘लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणं, या युगात फक्त आरएसएसचे स्वयंसेवकचं करू शकतात’, असं म्हणत नारायण दाभाडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आज अवधूत वाघ यांनी आणखी एक ट्विट करत “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही.” असं म्हणत नवीन वादाला तोंड फोडलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. ट्विटरवर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी आज सकाळी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मिळालेला बेड दाभाडकर यांनी एका गरजू तरुणाला देऊन मी माझं जीवन जगलो आहे. त्या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला त्या बेडची गरज असल्याचे बोलून दाखवत त्यांनी हमी पत्रावर स्वाक्षरी केली आणि रुग्णालयातून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या –

‘मिशन ऑक्सिजन’साठी क्रिकेटचा देव’ मदतीला धावला, केलं मोठं दान

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही तर हेलमेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढला; 15 मे पर्यंत अंमलबजावणी कायम

फुफ्फुसांव्यतिरिक्त ‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन, वेळीच व्हा सावध!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More