बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | आयपीएल (IPL) ही सर्वात रोमांचकारी क्रिकेट स्पर्धा बनली आहे. क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत (Rich Cricket League) स्पर्धा म्हणूनही आयपीएलला ओळखण्यात येतं. आयपीेएलचा 2021 हंगाम नुकतात संपला आहे आता क्रिेकेट रसिकांना 2022 च्या हंगामाची ओढ लागली आहे. तत्पूर्वी नव्यानं खेळाडूंच्या लिलावाची (Auction) प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर एक नवा वाद उफाळून आला आहे.

आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रतिभावान खेळाडू म्हणजे केएल राहुल (KL Rahul) हा आहे. राहुल गत 4 आयपीएल हंगामांपासून खोऱ्यानं धावा ओढत आहे. अशा परिस्थितीत पंजाब संघ (PBKS) त्याला सोडेल असं कोणालाही वाटलं नव्हते पण पंजाब व्यवस्थापकांनी राहुलला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनी राहुलच्या संघ सोडण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही राहुलला संघासोबत ठेवण्यासाठी उत्सूक होतो पण त्यानेच नकार दिल्याचा खुलासा वाडिया यांनी केला आहे. आर अश्विनला बाजूला सारत राहुलच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली पण त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे, असंही नेस वाडिया म्हणाले आहेत.

दरम्यान, पंजाब संघाच्या भविष्यासाठीच आम्ही राहुलवर विश्वास टाकला होता, असं पंजाब संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले आहेत. सध्या केएल राहुलनं लखनऊ संघासोबत बातचित केल्याच्या प्रकरणाची चौकशी बीसीसीआय करत आहे. यात जर राहुल दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

“काँग्रेसला ना इज्जत ना किंमत, झुकायचं की नाक घासायचंय हा…”

…अन् ‘त्या’ घटनेनंतर खासदारानं वाटले चक्क ‘चाॅकलेट आणि आंब्याचे पापड’

‘Sharad Pawar युपीएचे नेते होणार का?’, ममता बॅनर्जी म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More