बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेल डन छेत्री! दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप

नवी दिल्ली | जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणून फुटबाॅलकडे पाहिलं जातं. फुटबाॅलने अनेकांना वेड लावलं आहे. भारतात फुटबाॅलपेक्षा क्रिकेटचं सर्वात जास्त आकर्षण आहे. जगात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीला फुटबाॅलचा देव मानलं जातं. याच मेस्सीला भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीने पुन्हा एकदा मागे टाकलं आहे.

फुटबॉल वर्ल्डकप 2022 आणि आशिया कप 2023 च्या पात्रता स्पर्धेमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला 2-0 अशी मात दिली. या सामन्यात सुनिल छेत्रीने दोन गोल केले. या दोन गोलसह त्याने आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये आपला 74 गोलची नोंद केली आहे. या सामन्यात 79 व्या मिनीटाला आणि नंतर एक्स्ट्रा टाईममध्ये आणखी एक गोल करत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्याआधी छेत्री आणि मेस्सीचे समान 72-72 गोल होते. मेस्सी दुसऱ्या स्थानावर तर छेत्री तिसऱ्या स्थानी होता. छेत्रीने अर्जेंटिनाच्या दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत अवघ्या फुटबॉलविश्वाचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतले. वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत परदेशात 20 वर्षांनी भारताला हा पहिला विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रिय खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 103 गोलसह पहिल्या स्थानी आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 36 वर्षाचा छेत्री सध्या 11व्या स्थानावर पोहोचला आहे. वय झालं असलं तरी तो सध्याही भारतीय संघाकडून खेळतो. विदेशी लिगची करोडो रुपयांची ऑफर नाकारून त्यानं भारतीय संघातून खेळणं पसंत केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यावर पसरली धुक्याची चादर, पाहा व्हिडिओ

फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More