Top News देश

ममता दीदी, ही तर सुरूवात निवडणुकीपर्यंत एकट्याच रहाल- अमित शहा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. आज  पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असेलले भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

तृणमूल काँग्रेस आणि सीएएममधील 11 आमदारांनी आणि एका माजी खासदाराने शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शहांनी बॅनर्जींवर टीका करत ही सुरूवात असल्याचं म्हटलं आहे.

सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच रहाल, असं शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ममता दीदींना आठवण करून देतो की त्यांनी तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला ते पक्षांतर नव्हतं का?, असा सवालही शहा यांनी केला.

 

थोडक्यात बातम्या-

“105 जागा निवडून आणण्याच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेला तेवढ्या जागा मिळतील का”

राष्ट्रवादीच्या आमदाराची ‘ती’ योजना अण्णा हजारेंच्या गावाने स्वीकारली

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

‘विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागून महाराष्ट्रद्रोह करताय?’; शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

देशातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्धवस्त झालं- राहूल गाधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या