बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मंत्री चौधरी बशीर यांच्या विरोधात तिहेरी तलाकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी बशीर यांनी सहावे लग्न केल्यानंतर त्यांची चौथी पत्नी पोलीस ठाण्यात पोहचली. यानंतर बशीर यांचं पितळ उघडं पडलं. बशीर यांची चौथी पत्नी नगमा यांनी आग्रा मधील मंटोला पोलीस ठाण्यात बशीर यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चौधरी बशीर हे कपड्यांप्रमाणे बायका बदलतात, असा आरोप बशीर यांच्या पत्नीने केला आहे. चौधरी बशीर घटस्फोट न देताच सहावे लग्न करत आहेत, असा आरोप नगमा यांनी केला आहे. तसेच बशीर यांच्यावर आणखीही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

नगमा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चौधरी बशीर यांच्याविषयी अनेक गोष्टींचं पितळ उघडं पाडत गंभीर आरोप केले आहेत. 2012 मध्ये नगमा यांचं चौधरी बशीर यांच्यासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर बशीर यांनी आपला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं नगमा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बशीर यांनी अनेकवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप देखील नगमा यांनी केला आहे. नगमा यांनी त्यावेळी देखील बशीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा बशीर 23 दिवस तुरुंगात होते.

थोडक्यात बातम्या –

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

लग्नात नवरीने केली धमाकेदार एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व, लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार”

‘ना सरकारी नोकरी, ना पासपोर्ट’; दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती=

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More