खेळ

जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर चिडतो…

माऊंट मोउनगुई | आज चालू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. नुकतीच बंदी उठवल्यानंतर पहिलाच सामना खेळणारा हार्दिक पांड्या सामन्यादरम्यान चक्क शिखर धवनवर चिडताना दिसला.

पांड्याने 13व्या षटकांतील दुसरा चेंडू टाकला, हा चेंडु राॅस टेलरने खेळला. सीमारेषेवरुन धावत येत शिखर धवनने हा चेंडू अडवत विचित्र प्रकारे थ्रो फेकला. त्यामुळे एक अतिरिक्त धाव यजमान संघाने कमावली.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद शामीने 3 तर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

दरम्यान, थ्रो विचित्र पध्दतीने फेकला असल्याने पांड्यालाही तो चेंडू अडवता आला नाही. म्हणून पांड्या धवनवर चिडला आणि ‘कम ऑन यार’ असं म्हणत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-आता मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली- चंद्राबाबू नायडू

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार कन्येचा पराभव

-परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा

-कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी 

-धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच हेलिकाॅप्टर भरकटलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या