पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावरील खड्ड्यांवरुन चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. ‘सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम सुरु केल्यानंतर खड्ड्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी त्या चक्क पत्रकार बनल्या.
‘आयबीएन लोकमत’ वृत्तवाहिनीचा बूम हातात घेत सुप्रिया सुळे यांनी हडपसरमधील रस्त्यांची परिस्थिती सांगितली. तसेच नागरिकांच्या समस्यांही जाणून घेतल्या.
‘सेल्फी विथ खड्डा’ उपक्रमानंतर सरकार खड्ड्यांमध्ये माती टाकत असल्याचं लक्षात आलंय. सरकारने घाई करु नये. थोडा वेळ घ्यावा मात्र रस्ते चांगले करावेत, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
Comments are closed.