बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रीकरण सुरु असताना अभिनेत्री नुसरत भरूचाला अॅटॅक!

मुंबई | अभिनेत्री नुसरत भरूचा सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र नुकतंच चित्रीकरण सुरु असताना नुसरत अचानक सेटवर कोसळली. तिची प्रकृती बिघडल्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

‘लव रंजन’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. नुसरतची प्रकृती बिघडल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. नुसरतला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका मुलाखतीदरम्यान नुसरत भरूचानं तिच्या तब्बेतीविषयी माहिती दिली. जास्त तणावामुळे नुसरतला व्हर्टिगो अॅटॅक आला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रास होत आहे.

नुसरतनं या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत प्रेक्षकांना आणि चाहत्यांना माहिती दिली नव्हती कारण चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. नुसरतची प्रकृती बिघडल्यामुळे सध्या चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. सध्या नुसरतची प्रकृती स्थिर असून तिला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

दरम्यान, नुसरत भारूचानं ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्विटी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. खूप कमी काळात तिनं बाॅलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुसरत भारुचा तिच्या आणि अक्षय कुमारच्या आगामी ‘रामसेतु’ चित्रपटातही काम करत आहे.

थोडक्यात बातम्या –

भररस्त्यात महिलेने कारचालकाला केली बॅटने मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

खुशखबर! आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

‘न्यूड सीन दिले नाही म्हणून माझं करिअर संपलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पीएफ खातेदारांनो तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

‘पुढील दोन महिने धोक्याचे’; कोवीड टास्क फोर्सनं राज्याला दिला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More