राज्यात वातावरण पेटलं, रावसाहेब दानवे मात्र गायब!

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण तापलंय. त्यामुळे रावसाहेब दानवे सध्या गायब आहेत. कुणालाही त्यांचा ठावठिकाणा माहित नसल्याचं कळतंय. 

वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक पक्षांनी दानवेंवर बक्षिसांची घोषणा केली. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी कसल्याही परिस्थितीत दानवेंना धडा शिकवणार, अशी भाषा केली. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडूनही दानवेंचा शोध सुरु आहे. मात्र कुणालाच त्यांचा ठावठिकाणा मिळत नसल्याने दानवे नेमके आहेत तरी कुठे, असा प्रश्न सर्वांना पडलाय.

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या