Top News पुणे महाराष्ट्र

आंदोलन भडकावल्याचा आरोप असलेला दीप सिद्धू आणि भाजपचा संबंध काय?

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. यामध्ये एक नाव समोर आलं ते दीप सिद्धूचं… त्याचं नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी त्याच्यापासून हात झटकले असून तो भाजप तसेच आरएसएसचा एजंट असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

दीप एक प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. त्याचे काही पंजाबी चित्रपट तुफान लोकप्रिय झालेले आहेत. अभिनेता सनी देओल २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिल्यानंतर त्याने दीपला निवडणूक प्रचारात सहभागी करुन घेतलं होतं.

दीप आणि सनी देओलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ते याच प्रचार कालावधीतील असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर दीप सिद्धू आणि माझ्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही, असं सनी देओलनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दीप सिद्धू आधीपासूनच शेतकरी चळवळीशी जोडला गेलेला आहे. २५ सप्टेंबर रोजी दिल्ली-हरयाणा रस्त्यावरील शंभू येथे त्याने शेतकरी तसेच काही कलाकारांसोबत निदर्शने केलेली आहेत.

दरम्यान, दीपने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने यासंदर्भात एक फेसबुक लाईव्ह केलं आहे. खाली पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

लग्न झालेल्या प्रेयसीसोबत प्रियकर बेडरूममधे तितक्यात प्रेयसीचा नवऱ्याने ठोठावलं दार… नंतर घडला धक्कादायक प्रकार!

“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”

शेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ

…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या