बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानसह हायप्रोफाईल केसेस लढवणारे सतीश मानशिंदे एका दिवसासाठी आकारतात ‘इतके’ लाख

मुंबई | राज्यात सध्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलंच गाजत आहे. याच पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीकडून अटक करण्यात आली. मुलाच्या अटकेनंतर शाहरूख खानने केसची जबाबदारी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्यावर सोपवली आहे. बॉलिवूडची हायप्रोफाईल केस म्हटलं की सतीश मानशिंदेंचं नाव हमखास समोर येतं. पण मोठमोठ्या सेलिब्रिटींची केस लढवणारे हे वकील सतीश मानशिंदे आहेत तरी कोण? त्यांची एक दिवसाची फी वाचून थक्क व्हाल.

56 वर्षीय सतीश मानशिंदे लॉ ग्रॅजुएट फ्रेशर म्हणून मुंबईत आले होते. मुळचे धारवाडचे रहिवासी असणारे मानशिंदे 1983मध्ये नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध क्रिमीनल लॉयर राम जेठमलानी यांच्याकडे नोकरीला सुरूवात केली. मानशिंदेंनी जेठमलानी यांच्या अंतर्गत कनिष्ठ वकिल म्हणून कार्यरत असताना त्यांनी 10 वर्ष दिवाणी आणि गुन्हेगारी कायद्याची प्रॅक्टीस केली. यात त्यांनी  दिग्गज नेते, अभिनेत्यांकडून केस लढवल्या.

बॉलिवूडमध्ये सतीश मानशिंदेंचं मोठं नाव आहे. हे तेच वकील आहेत ज्यांनी याआधी संजय दत्त, सलमान खान आणि नुकतीच रिया चक्रवर्तीचीही केस लढवली होती. सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणात ते सलमानचे वकील होते. तर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी संजय दत्तची बाजू लढवली होती. तर नुकत्याच गाजलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्यांनी सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केसही लढवली होती.

अनेक हायप्रोफाईल केसमध्ये सतीश मानशिंदेंची वकील म्हणून नियुक्ती होते. विश्वासू सेलिब्रिटी वकील म्हणून ओळखले जाणारे मानशिंदेची फिसही गलेलठ्ठ आहे. बॉलिवूड लाईफच्या एका अहवालानूसार सतीश मानशिंदेंची एका दिवसाची फी तब्बल 10 लाख रूपये इतकी आहे. अनेक हायप्रोफाईल केसनंतर मानशिंदे आता आर्यन खानची बाजू लढवत आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

“मोठ्याचा मुलगा असो किंवा कोणत्या नेत्याचा सर्वासाठी कायदा हा समानच आहे”

सलग 4 दिवसांच्या दरवाढीनंतर आता इंधन दरवाढीला ब्रेक; पाहा आजचे दर

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसं उत्तर द्या- मनोहरलाल खट्टर

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More