बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैराटच्या आर्चीचं काळीज कुणी चोरलं?, पाहा नेमकं काय म्हणतेय…

मुंबई | आजकाल सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी एखादा फोटो पोस्ट करून, तर कधी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन त्यांच्याशी संवाद साधत असतात. तसेच आता तर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचं खूपच फॅड सुरू झालं आहे.

यामध्ये सर्वसामान्य मुला-मुलींपासून ते अगदी बॉलिवूडच्या दिग्गज स्टारला देखील याचं वेड लागलं आहे. यामध्ये ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी ‘आर्ची’ म्हणजेच खऱ्या आयुष्यातील रिंकू राजगुरूही यामध्ये कमी नाही. रिंकूही आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. ती सतत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते. अशातच तिने एक मनाला भुरळ पाडणारा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

रिंकूने ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये ती गाण्यातील बोल फिल करत आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत आहे. ती ज्याप्रकारे आपल्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन देत आहे. त्यावरून असं वाटतं आहे की, ती कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून, तिने तिच्या चाहत्यांना वेड लावलं असल्याचं बोललं जात आहे.

तसेच रिंकूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे तिच्या या व्हिडीओ अनेकांनी लाईक केलं असून, आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 600 लोकांनी कमेंट केलं असल्याचं समजतं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही”

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More