अहमदनगर

“सुशांतएवढी चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल, दूध दराबद्दल, ऊसाबद्दल का नाही?”

अहमदनगर | राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. एवढंच काय तर अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.

एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल का नाही?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजू शेट्टी बोलत होते.

लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल एवढी चर्चा झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं, असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अब बस….’; ट्रोलिंगविरोधात सोनाक्षी सिन्हाने छेडली मोहीम

‘इतिहासामध्ये तुझं नाव….’;पंतप्रधान नरेंद्र मोदींचं धोनीला खास पत्र

आचार्य बाळकृष्ण यांचा ‘रुची सोया’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार!

प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या