महाराष्ट्र मुंबई

सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना

मुंबई |  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं शिवसेनेला बारामतीची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती समोर येत आहे. शिवसेनेनं बारामतीतून राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी द्यावी, असं भाजपनं सूचवलं आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय पालघरच्या जागेवर अडला आहे. पालघरच्या जागेवर शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.

पालघरच्या जागेऐवजी भाजपनं शिवसेनेला बारामतीची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. बारामतीतून मागील निवडणुकीत रासपचे महादेव जानकर सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढले होते,

दरम्यान, शिवसेनेनं भाजपचा प्रस्ताव मान्य केल्यास विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार होणार का? अशा चर्चा सुरु आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

“गडकरींच्या मनात तसेे काही असते तर ते मला बोलले असते”

मुलाच्या लग्नानंतर आता राज ठाकरे लावणार 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न!

-‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ घोषणा देऊ नका; राहुल गांधींच्या सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या