बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेने वाटेतच दिला बाळाला जन्म आणि दुर्देवाने व्हायला नको तेच झालं…

औरंगाबाद | रस्त्यावरील खडड्यांमुळे एका महिलेची रूग्णालयात नेताना वाटेतच प्रसूती झाली आहे. मात्र हादरे बसल्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झाला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर बंगला या गावातील ही महिला आहे. महिलेला रात्री अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्याने खासगी वाहनातून औरंगाबादला रुग्णालयात घेऊन चालले होते. परंतु खड्ड्यांमुळे वाटेतच गारज या गावाजवळ महिलेची प्रसुती झाली आणि यात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेचा आसपासच्या भागातून संताप व्यक्त केला जातोय.

साजिया शेख असं या महिलेचं नाव आहे तर समीर शेख हा तिचा पती आहे. ते दोघेही मोलमजूरी करतात. साजियाला मध्यरात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यानंतर समीर याने लगेच तिला रुग्णालयात नेण्य़ासाठी खासगी वाहनाची सोय केली. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाटेतच साजियाची प्रसूती झाली आणि यात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर समीर शेख  आणि नातेवाईकांनी रुग्णालयात न जाता तसेच माघारी घरी जाण्याचा निर्णय घेतला.

रात्री दिड ते दोनच्या आसपास ही घटना घडली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे साजियाला रुग्णालयात पोहचायला वेळ तर लागलाचं. याशिवाय बाळाला पोटात हादरे बसल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर समीर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बाळाचा जीव गमवावा लागल्याने समीर आणि साजिया दु:खी झाले आहेत.

नागरिकांनी वारंवार सांगुनही खड्डे बुजवण्यात आले नसल्याने एका निष्पाप जिवाचा नाहक बळी गेला आहे. या घटनेनंतर आता नागरिकांनी मात्र प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय. अनेकवेळा अशा घटना घडूनसुद्धा हे रस्ते दुरूस्त करण्यात येत नसल्याने नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासन हे खड्डे बुजवून नवीन रस्ते कधी बांधणार? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, सर्वसामान्य नागरिक त्रस्त

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

“तालिबानी सरकार आणि योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More