बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. तसेच जर हे नियम पाळले नाहीत तर दंड देखील लागू केला आहे. हे दंड गोळा करण्यासाठी पोलील यंत्रणेला कामाला लावण्यात आलं आहे. मात्र याचाच गैरफायदा एका महिलेने घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या नियामांच उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची वसूली एक महिला बेकायदेशीर रित्या करत असल्याचं समोर आलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील आहे. संबंधित महिला पोलीस बनून मास्क घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांकडून दंड घेत होती.

महू रोडवरील बस स्टँडवरील काही दिवसांपासून दुकानदार तसेच बसमध्ये चढणाऱ्या लोकांना घाबरुन धमकावून ही महिला वसूली करत असल्याचं समोर आलं आहे. तिथे एक फळविक्रीता महिलेला तिच्यावर संशय आल्यामुळे तिने प्रशानाकडे तक्रार केली.

दरम्यान, या महिलेची चौकशी चालू असून ती जावारा येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचं तिने चौकशी दरम्यान सांगितल आहे. महापालिकेच्या चालन कापणाऱ्या टीमसोबत ही महिला काम करत होती.

थोडक्यात बातम्या-

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ

पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More