मुंबई | देशभरात कोरोनानं चिंताजनक वातावरण निर्माण केलं आहे. कोरोनाची लाट कुठे ओसरत असतानाच नवनवीन व्हेरिएंट डोकं वर काढत आहे. कोरोनानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असून बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण होत आहे. राज्यातला वाढता मृत्यूचा आकडा आणि वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोकाही अजून वाढला आहे.
डेल्टाचा संसर्ग जास्त तरुणांना होत असल्याचं समोर येतोय. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत असे 10 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता 66 वर पोहोचली असून 66 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, डेल्टाच्या वाढत्या संसर्गामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातच नाही तर विदेशातही डेल्टाच्या विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 % एवढा आहे. तर राज्यात एकूण 63,004 सक्रिय रुग्ण आहेत.
थोडक्यात बातम्या –
पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट
कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी
सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला
Comments are closed.