बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! Omicron झालेल्या मुलांमध्ये दिसून येतायेत ‘ही’ गंभीर लक्षणे

नवी दिल्ली | कोरोना महामारीचं संकट संपलेलं नसतानाच ओमिक्राॅन व्हेरिएंटनं (Omicron Varriant) डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

लसीकरण पूर्ण होऊनही ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाचं टेंशनही वाढलं आहे. यातच आता ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

ओमिक्राॅनबाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये सतत खोकला, थकवा, तीव्र स्वरूपाचा ताप,घशात खवखवणे, भूक न लागणे अशी लक्षणं आढळून येत आहेत. असं अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं सांगितलं आहे.

दरम्यान, तरुणांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी, जास्त प्रमाणात थकवा अशी लक्षणं आढळत आहेत. डेल्टा व्हेरिएंटमध्ये आढळून येत असलेली लक्षणं मात्र या ओमिक्राॅन व्हेरिएंटमध्ये दिसून येत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More