Top News

आता माघार नाही!; शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ‘द ग्रेट खली’ही सहभागी

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन केलं आहे. अशातच शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ डब्लूडब्लूई सुपरस्टार द ग्रेट खलीने पाठींबा दर्शवला आहे.

सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं खलीने म्हटलं आहे. यासंदर्भातील खलीचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शेतकऱ्यांकडून धान्य कमी किमतीत विकत घेतल जाईल आणि ते सामान्य माणसाला 200 च्या हिशोबाने विकलं जाईल. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं खलीने म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री रतनलाल कटारीया यांनी या शेतकऱ्यांनी  दुसरीकडे जाऊन मरावं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

अपघातग्रस्त व्यक्तीला भाजप आमदार राम सातपुतेंचा मदतीचा हात!

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवार म्हणाले…

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

‘माफी मागा अन्यथा तोंड काळ करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या