बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इथं कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही तर बाकी ‘शहांची’ काय गोष्ट”

मुंबई | देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shaha) यांचा महाराष्ट्र दौरा बराच गाजत आहे. देशाच्या पहिल्या सहकार परिषदेसाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात आले होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर (MVA Government) यथेच्छ टीका केली आहे. या टीकेला आता महाविकास आघाडीकडून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

अमित शहांनी महाविकास आघाडीवर विविध मुद्द्यांचा आधार घेत टीका केली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप केला होता. राज्यात सहकाराची वाट कोणी लावली?, सहकारी बॅंका कोणी लुबाडल्या?, असे धारदार प्रश्न अमित शहांनी आपल्या भाषणादरम्यान नाव न घेता केले होते. परिणामी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

महाराष्ट्राच्या पराक्रमासमोर कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही, बाकी ‘शहांची’ काय गोष्ट, अशी जहरी टीका यशोमती ठाकूर यांनी अमित शहांवर केली आहे. अमित शहांच्या दौऱ्यात महाविकास आघाडीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. तीन पायांचे हे सरकार आहे आणि याची तिन्ही चाकं पंक्चर आहेत, अशी टीका अमित शहांनी केली होती.

दरम्यान, अमित शहांनी महाविकास आघाडीच्या पराभवाला पुणे महापालिकेतून सुरूवात होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. परिणामी महाविकास आघाडी येत्या काळात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील महापालिका निवडणूक एकत्र लढवणार की नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

थोडक्यात बातम्या 

“सरकारनं मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, उद्या अधिवेशनात 106 आमदार…”

दहावी बारावी परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिसाहात नोंद होईल”

गडकरी म्हणतात,”लखीमपूर घटना म्हणजे केवळ अपघात, राजीनामा मागणं चुकीचं”

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जोरदार झटका; मतदानाच्या दिवशीच बाप-लेकाला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More