मला भेटण्यासाठी मोदींकडे वेळ नाही; यशवंत सिन्हांची तक्रार

कोलकाता | मी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना पत्रंही लिहिली, मात्र मला भेटण्यासाठी मोदींकडे वेळ नाही, अशी तक्रार भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केलीय. त्यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं.

मी भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही. तसा कोणताही विचार माझ्या मनात नाही. पण पक्षाला वाटत असेल तर त्यांनी मला खुशाल पक्षातून काढू टाकावं, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार का? त्यांना पुन्हा दुर्लक्षित करणार हा प्रश्न आहे.

एनडीएनं दिलेली आश्वासनं आणि सरकारची धोरणं यांमध्ये मोठी तफावत आहे. सरकारने जाहीरनाम्यानूसार काम करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.