“होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे, 2024 च्या निवडणुकीनंतर…”
मुंबई | काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर अनेक आरोप केले होते. संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. ते पुर्णत: राष्ट्रवादीचे आहेत, नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
होय, मी राष्ट्रवादी आहे. मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की, शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढचं नाही तर 2024 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील अनेकजण बेरोजगार झालेले असतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. ते आता पुर्णत: राष्ट्रवादीचे झाले आहेत. संजय राऊत प्रभातला असताना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांवर टीका करण्याचं सोडलं नव्हतं, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. हा काय अस्वस्थ झाला आहे. हा काल कसा बेजबाबदार बोलत होता, असंही नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यापासूून दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा संघर्ष वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे. माझ्या नातेवाईकांना, मित्रांना त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच चौकशी करण्याचं खुल आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं होतं.
थोडक्यात बातम्या-
“बाटगा जास्त कोडगा असतो, नारायण राणे हे लाचार नेते”
“संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, सगळी कुंडली बाहेर काढीन”
“एक स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानचा पंतप्रधान…”; कुमार विश्वास यांच्या आरोपाने राजकारणात खळबळ
“उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, संजय राऊत तुम्हाला घेऊन एकदिवशी नक्कीच डूबणार”
एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…
Comments are closed.