राम मंदिरावरून धमक्या देणाऱ्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू!

जयपूर | देशाच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा अग्रभागी आहे. त्याच राम मंदिरावरून दहशतवादी मसूद अजहरने धमकी दिली होती. त्याच्या धमकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते राजस्थानमधील विजयनगर येथील सभेत बोलत होते. 

मसूद अजहरसारखे दहशतवादी आम्हाला राम मंदिराबाबत धमकी देणार असतील तर पुढच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये त्याचा आणि त्याच्यासारख्या अनेकांचा खात्मा करू, असं योगींनी म्हटलं. 

तसंच त्याला पोसणारे त्याचे पोशिंदे आमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत, असंही योगींनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, राम मंदिर उभारलं तर दिल्ली ते काबूलपर्यंत दंगली उसळतील, अशी धमकी मसूद अजहरने दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतील अशी वक्तव्य करु नका- संजय राऊत

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड