बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

e-Aadhar संदर्भात ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली | आधार कार्ड (e-Aadhar) हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. जे सिद्ध करतं की तुम्ही भारताचे नागरिक आहात. 2009 साली भारत सरकारने देशात एक विशेष आणि महत्त्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केलं. सध्या कोणत्याही महत्वाच्या कामासाठी आधारकार्डची गरज भासते. त्यामुळे ते सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी वापरकर्त्यांना मास्क आधार किंवा ई-आधार वापरण्याचा सल्ला दिला जातो. तुमच आधार कार्ड किती काळ वैध आहे आणि तो कधी वापरता येईल याची तुम्हाला कल्पना आहे का?, या लेखात आपण पुढे ते जाणून घेणार आहोत.

ई-आधारकार्ड ही पासवर्ड-संरक्षित आधाराची ऑनलाइन प्रत आहे. यावर UIDAI प्राधिकरणाने डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे. हे मिळवण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल अ‌ॅप्सवरुन डाऊनलोड करु शकता. यामध्ये तुम्हाला 12 अंकी क्रमांक देखील दिलेला असतो. यासाठी तुम्हाला एक पासवर्ड दिला जातो. पासवर्ड हा कॅपिटलमधील नावाची पहिली 4 अक्षरे आणि जन्म वर्ष (YYYY) पासवर्डचे संयोजन असू शकतो. जसं की एखाद्याचं नाव SOURABH असेल आणि त्यांची जन्मतारीख 1998 असेल तर पासवर्ड SOUR1998 असेल.

ई-आधारकार्ड हुबेहुब प्रिंट केलेल्या आधाराकार्डसारखं असतं. ज्यात वापरकर्त्यांचे नाव, तारीख, पत्ता या सगळ्या गोष्टीनमूद केल्या गेलेल्या असतात. या आधारकार्डची वैधता तितकीच असते जितकी प्रिंटिगच्या आधारकार्डची असते. त्यामुळे जेव्हा प्रिंटिगच्या आधारकार्डची वैधता जेव्हा संपेल तेव्हाच ई-आधारकार्डची वैधता संपेल.

थोडक्यात बातम्या

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय!

शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More