बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका”

मुंबई | मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा सुरू होती. परंतू त्यांना कोणतही पद मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यांचे राजीनामेही नामंजूर केले.

यामुद्यावरून सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षनेत्यांवर चांगलाच निशाणा साधायला सुरूवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यामुद्यावरून पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं असल्याचंही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका, असं म्हणत अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेत्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

त्याचप्रमाणे या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलं आहे. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण असल्याचंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं- नाना पटोले

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लश्कर ए तोयबचे तीन अतिरेकी ठार

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More