बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हसून हसून लोटपोट व्हाल! मुलगी पटत नाही म्हणून तरूणाचं थेट आमदारांना पत्र

मुंबई | प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. प्रेमाला वयाचं, काळाचं आणि रंगाचं बंधन नसतं. कोणाचं कधी कोणावर प्रेम होईल हे काही सांगता येत नाही. तर एकतर्फी प्रेमातून देखील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असतात. त्यातच आता अशीच एक घटना समोर आली आहे. मुलगी पटत नाही म्हणून एका तरूणानं थेट आमदाराला पत्र लिहिलं आहे.

मुली पटत नाही आणि भाव देत नाही त्यामुळे एका तरूणाने थेट आमदारांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तरूण लिहतो. सविनय विनंती याप्रमाणे आहे की, आपल्या संपुर्ण तालुक्यात भरभरून मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्यानं ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेड्यागावाला असून दररोज राजूरा येथे दररोज फेरी मारतो. परंतु मला एकही मुलगी पटली नाही, असं या पत्रात तरूणानं लिहिलं आहे.

दारू पिणाऱ्या लोकांना मुलगी असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी आपणास विनंती आहे की, विधानसभा क्षेत्रातील तरूणींना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांना भाव द्यायला सांगितलं पाहिजे, असं पत्र तरूणाने लिहिलं आहे.

दरम्यान, सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या पत्रातील लिहलेला मजकूर वाचून अनेकजण हसून हसून लोटपोट झाले आहेत.

वाचा पत्र-

Photo Credit- Twitter/ Saurabh spotlight

थोडक्यात बातम्या-

पुण्यात मुसळधार पाऊस! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा खुलासा

‘…त्यामुळं CM नाही तर PM बदला’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा

दिग्गजांना डावलून भूपेंद्र पटेल यांची निवड; वाचा कोण आहेत भूपेंद्र पटेल?

बार्टी बंद पाडण्याचे षडयंत्र?; स्टुडंट हेल्पिंग हॅंडचा आंदोलनाचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More