बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…”; स्टोरी ठेवत तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

औरगांबाद | एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने तलावात उडी मारत आत्महत्या (17 years old minor boy commits sucide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. औरगांबाद येथील हर्सूल तलावात उडी मारत त्याने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने इन्स्टाग्रावर स्टोरी टाकत जीवन संपवलं आहे.

कुणाल देहाडे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. तो रामनगर परिसरातील मुकुंदवाडी येथे राहत होता. त्याला मोठे दोन भाऊ आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने मित्रमैत्रिणींसोबत कॉन्फरन्स कॉल केला होता. मला धोका मिळाला असून मी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करत असल्याचं कुणालने मित्रांना सांगितलं होतं.

कुणालच्या मित्रांनी तात्काळ रेल्वेस्टेशनकडे धाव घेतली, मात्र तिथे तो आढळला नाही. त्यानंतर कुणालचा पुन्हा एकदा कॉल करत मी तलावात उडी मारून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी मित्र तलावाकडे गेले असता तिथे त्याची बाईक सापडली. त्यानंतर अग्निशमन दलाने 5 दिवस शोधल्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह सापडला.

दरम्यान, कुणालने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. त्या स्टोरीचा आणि कुणालच्या आत्महत्येचा संबंध जोडला जात आहे. ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर उन हजारोंमे हम नही,’ अशी स्टोरी कुणालने ठेवली होती. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ प्रसिद्ध कंपनीचे फोन आजपासून होणार बंद, वाचा सविस्तर

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती?; शिवसेना मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

‘महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही’; अजित पवार संतापले

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More