बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुझा पती माझा आहे…” असं म्हणत मुलीने आमदाराच्या सुनेवर केला हल्ला

लखनऊ | लखनऊच्या माजी आमदाराच्या सुनेवर एका मुलीने घरात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित सुनेचं नाव एकता असं असून संबंधित आमदार विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत.

एकता यांनी पोलीस ठाण्यात संबंधित मुलीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे.ही घटना 29 मे रोजी सकाळी घडली.हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोर महिला थेट घुसली. संबंधित मुलीचं नाव वीरांगना सिंह असं आहे. घटनेवेळी घरात एकता आणि तिची बहिण होती. पती अविनाश बाहेर गेले होते.

दरम्यान, विरांगना घरात घुसून एकताचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र यावेळी एकताच्या बहिणीने तिला वाचवलं. यावरच मुलगी थांबली नाही तर यानंतर विरांगनाने एकता वर राॅडने हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. हल्ल्यासाठी आलेल्या विरांगनाने एकतावर तुझा पती माझा आहे, तुला मरावं लागेल, असं म्हणत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, एकताने विरांगना विरुद्ध तक्रार नोंदवली असून पोलीस याबाबतचा तपास करत आहे. तसेच संबंधित मुलगी ही अविनाशची केवळ मैत्रीण आहे की कोणी दुसरी याचा देखील पोलीस शोध लावत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच”

जीमचा प्रभाव पाहण्यासाठी महिलेनं काढले तसले फोटो, अन् चुकून घडला धक्कादायक प्रकार

‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी

‘मुंबई सागा’ चित्रपटात RSSची बदनामी?; चित्रपटातील ‘या’ दृष्यांवर संघाचा आक्षेप

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More