पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉल्स, दुकाने, पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे पुण्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची जेवणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोरोना विषाणूच्या भीतीने संपूर्णपणे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सर्व दुकाने, कार्यालये, खानावळी आणि हॉटेल्स बंद ठेवल्या आहेत. परिणामी शिक्षण आणि रोजगारासाठी शहरात राहणारे युवक, विविध इस्पितळात इतर रुग्ण इत्यादींची जेवणाची गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून गरजुंसाठी पार्सल स्वरूपात जेवणाची व्यवस्था युवक काँग्रेसचे सरचिटणीस मानस पगार यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरू केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी जनतेला मदत करण्यासाठी इतर महानगरे आणि शहरात
पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.
आज रात्री 8.30 वाजता अहिल्या अभ्यासिकेशेजारी (शास्त्री रोड) ,पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पार्सल जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा .
दिनेश सरताळे -7499377102 ,
अमर पाटील – 7350503889
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती
जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाची लागण झाली कनिकाला, अन् चिंतेत पडली संसद
“कोणाच्या बापात महाराष्ट्र सरकार पाडायची हिम्मत नाही”
अजित पवारांकडून आरोग्यमंत्र्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाले…
Comments are closed.