महाराष्ट्र सातारा

10 ते 2 ला शिथीलता, मग त्यावेळेत कोरोना होत नाही का?- उदयनराजे भोसले

सातारा | कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन लॉकडाऊन करत आहे. सातारा जिल्ह्यातही 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामध्ये  सकाळी 10 ते 2 च्या दरम्यान शिथीलता देण्यात आली आहे. यावर 10 ते 2 ला शिथीलता दिली मात्र या वेळेत काय कोरोना होत नाही का?, असा सवाल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

लॉकडाऊन करणे हा काही कोरानाला रोखण्यासाठीचा उपाय नाही. यामुळेच एकाच वेळी सगळीकडे शिथीलता देणं योग्य नाही. शिथीलता करायचीच असेल तर ती टप्याटप्याने करण्यात यावी, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

उदयनराजे यांनी आज सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग  भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊन शिथील करण्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, शंभर वर्षातुन एकदा असा रोग येतो. या परिस्थितील सामोर जाण्यासाठी ही एक शिकवण आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा काही उपाय नाही.  कारण लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. चोऱ्या वाढल्या आहेत, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवार हेडमास्तर आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं- चंद्रकांत पाटील

पुण्याजवळील चाकणमध्ये महाराष्ट्र हादरवणारी घटना; 17 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार

गावात रेंज नसल्यानं ऑनलाईन क्लाससाठी युवकाची धडपड; सेहवागनंही केलं जिद्दीचं कौतुक!

सोनिया गांधी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या, त्याचं काय झालं?- पियुष गोयल

गृहमंत्री अनिल देशमुखांची माणुसकी; सुप्पर आजीला केली ‘ही’ मोठी मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या