मुंबई | एसएससीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आता एचएससीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा पुसला जाणार आहे. नापास झालेेल्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर पुन:परिक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकासासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी दहावी बारावीच्या पुनर्परीक्षेत यशस्वी होणार नाहीत त्यांना नापास न ठरवता कौशल्यविकासासाठी थेट प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुष्यभर 12 वी नापास असा शिक्का बसण्यापासून आता राज्यातील विद्यार्थ्यांची कायमची सुटका झाली आहे.
10 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरचा नापास हा शेरा यापूर्वीच काढून टाकण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागाने 10 वी आणि 12 वी तल्या कौशल्य विकासासाठी पात्र असा शेरा मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य सेतू’ योजना आखली आहे. त्यामुळे आता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर देखील सुधारित शेरे पाहायला मिळतील.
दरम्यान, शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाने विद्यार्थी वर्गात कशा प्रकारचं वातावरण आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
महाविकास आघाडी सरकार फक्त योजना बंद करत सुटलं आहे का?; जयंत पाटील म्हणाले…
महत्वाच्या बातम्या-
अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा… रामदास आठवले
सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह
“मुसलमानांना 1947 सालीच पाकिस्तानात पाठवलं असतं तर बरं झालं असतं”
Comments are closed.