राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी
मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती झाली तर संबंधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची मुभा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदीचा निर्णय सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते आठ एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची घोषणा. pic.twitter.com/ZEUuacYbev
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) March 27, 2021
औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते आठ एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची घोषणा. pic.twitter.com/ZEUuacYbev
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) March 27, 2021
राज्य सरकारनेही कोरोनाच्या निर्बंधांबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणं नागिरांकाना अनिवार्य असणार आहे, पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये अशा सूचना आहेत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर
‘मी त्यासाठी आयुष्यात कधीच खेळलो नाही’; विराट कोहलीने मांडलं रोखठोक मत
“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”
अदर पुनावालांकडून गुज न्युज! कोरोनाच्या दुसऱ्या लशीबाबत केली मोठी घोषणा
“ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत”, भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.