Top News महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरोध!

मुंबई | औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमध्ये विरोधाभास असल्याचं चित्र दिसत आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. अशातच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी नेते नबाव मलिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.

काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आले असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत आम्हाला सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’”

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यूट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या