बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही’; पवारांनी युजीसीवर साधला निशाणा

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत कोरोना लस देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर देशातील 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची युजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल, असं म्हणत रोहित पवार यांनी युजीसीवर टीका केली.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, या संदेशासोबतच्या चित्रामध्ये ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं लिहिलं आहे. यूजीसीच्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेक विद्यार्थी संघटनेनं याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल- चंद्रकांत पाटील

कसोटी विश्वचषकात ‘या’ भारतीय गोलंदाजाने मिळवले सर्वाधिक बळी, फलंदाजीत टॉप 3 मध्ये एकही भारतीय नाही

“तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो”

कोरोनाकाळात आता सरपंचांना मिळणार विमाकवच; ‘या’ जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More