मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.
राज्यातील कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सातत्याने वाढणाऱ्या या आकड्यामुळे शासन-प्रशासन कडक पावले उचलण्याची शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज तब्बल 15 हजार 602 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पुन्हा काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत नवीन 7 हजार 467 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आता 92.49% इतका झाला आहे. त्यामुळे, राज्य सरकार ही नियंत्रणात आणण्यासाठी कोणते नवे निर्बंध लागू करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात एकूण आता 1 लाख 18 हजार 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.
राज्यात आज 15602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2125211 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 118525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 13, 2021
थोडक्यात बातम्या –
शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ
गाण्यावर जखमी जेनेलिया, रितेश देशमूख आणि मित्रांनी केला अफलातून ‘डान्स’, पाहा व्हिडिओ
फक्त भाजप सत्तेत येऊ नये त्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील
‘या’ घोडचुकीने पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन
राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे- विखे पाटील
Comments are closed.