बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

सांगली | ‘संथ वाहते कृष्णामाई’ असं पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं जातं. परंतू आता कृष्णा नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे. आता धो-धो पडणाऱ्या पावसामुळे आता सांगलीत महापुराचा मोठा फटका बसताना दिसत आहे. सततच्या पावसामुळे कृष्णानदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 52 फुटांपेक्षा जास्त जाणार नाही, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला होता. परंतु, अंदाज खोटा ठरवत कृष्णेने तब्बल 55 फुटांपर्यंत मजल मारल्यानं नदीपात्रापासून सुमारे तीन किलोमीटर सांगली शहर परिसरात पुराचं पाणी घुसलं आहे.

सांगलीत पडणाऱ्या पावसाचा फटका आता नदीकाठच्या नागरिकांना बसलेला दिसत आहे. त्यामुळे आता 41 हजार 84 कुटुंबाला स्थलांतर करावं लागलं आहे. ज्यात तब्बल 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचा समावेश आहे. माणसांबरोबरच 32 हजार लहान मोठ्या जणावरांचं देखील स्थलातंर करण्यात आलं आहे. महापुरामुळे सांगलीतील 206 गावांना मोठा फटका बसला आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी 52 फुटांपेक्षा जास्त जाणार नाही, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला होता. शनिवारी रात्री कृष्णेचं पाणी 50 फुटावर होतं. परंतू रविवारी रात्री ते पाणी 55 फुटापर्यंत वाढलं. त्यामुळे सांगलीच्या शहरी भागात देखील पुरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील 3 किलोमीटर परिसरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर काही भागात 8 ते 10 फुट पाणी देखील साचलं आहे.

दरम्यान, गणपती पेठ, सराफ कट्टा, मेन रोड, गवळी गल्ली, शिवाजी मंडई, महापालिका परिसर,कापड पेठ, मारुती रोड, हरभट रोड, राजवाडा चौक, स्टेशन रोड, मीरा हौसिंग सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, सर्किट हाऊस परिसर, वखार भाग, सांगली हायस्कूल, बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खणभाग या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता, त्यामुळे…- डॉ. रणदीप गुलेरिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More