मुंबई | मुंबईत आज 81 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 450 पार गेला आहे. तर महाराष्ट्रात आज 113 नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 748 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या जागा ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरल्या आहेत. मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
राज्यात कोरोनाबाधित 113 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे तर आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलंय, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 472 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.
राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!
पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर
महत्वाच्या बातम्या-
मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे
सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नाही, जादा दराने विकणार्यांना शासनाचा कारवाईचा इशारा
Comments are closed.