देश

देशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले

लखनऊ | लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत जवळपास 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण परतले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्याचे पाहून, केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेला. परिणामी सर्व प्रकारच्या व्यवहारांसह उद्योगधंदे बंद झाल्याने, देशभरातील हातावर पोट असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती इतक्यात काही सुधरणार नसल्याचे पाहून स्थलांतरितांनी सरकारकडून परवानगी मिळताच, मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्यांची वाट धरली आहे.

स्थलांतरितांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. याद्वारे लाखो स्थलांतरित मजुर आपल्या गावी परतले आहेत आणि अद्यापही परतत आहेत.

दरम्यान, देशभरातील स्थलांतरित मजुरांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

राज्यात आज 821 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या