बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

मुंबई | ईडीने (ED) राज्यात कारवाईचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीने शिवसेनेला (Shivsena) आणखी एक धक्का दिला आहे. ईडीने शिवसेना नेत्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त केल्याने शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणी ईडीने सरनाईकांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या.

एनएसईएल घोटाळा प्रकरणात प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स बजावल्यानंतर ईडीने अचानकच सरनाईकांवर कारवाई केली. ईडीने सरनाईकांवर मोठी कारवाई करत त्यांची 11 कोटी 36 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे.

दरम्यान, सरनाईक यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगची प्रकरणी केस दाखल झाली. त्यानंतर त्यांना अनेकदा समन्स पाठवूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडीने प्रताप सरनाईकांवर कारवाई केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!

“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; वाचा ताजे दर

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More