Rahul Gandhi 3 - राहुल गांधींची 'ती' मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार...
- देश

राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

नवी दिल्ली| राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राहुल गांधी यांनी हैदराबादमधील एका स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत दिली होती.

याच मुलाखतीवरून भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधीवर पेड न्यूजचा आरोप केला आहे. याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तेलंगणा आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या बरोबर एक दिवस अगोदर राहुल गांधींनी मुलाखतीच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणा आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने राहुल यांच्यावर केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”

-चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली

या बातमीवर तुमची कमेंट लिहा