भ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा!

लखनऊ | देशातून भ्रष्टाचार पुर्णपणे संपवायचा असेल तर चलनातून 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा, असा अजब सल्ला उत्तर प्रदेशचे भाजप सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला आहे. तसं त्यांनी ट्वीट केलं आहे.

या नोटा बंद केल्यावरच भ्रष्टाचाराला आळा बसेल, असं त्यांनी म्हटलं आहे. राजभर यांनी भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यापुर्वीही त्यांनी अनेकदा भाजपच्याविरोधात वक्तव्यं केली आहेत.

भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर 1 रुपया ते 100 रुपये एवढ्याच नोटा चलनात ठेवाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटा बंदीनंतर 2 हजारच्या नोटेला योगगुरु बाबा रामदेव यांनीही बंद करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

-वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?