बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रभरात हाहाकार माजवला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे उपचाराअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.  त्यातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज कोरोनामुळे एका 09 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनासह पालकांची चिंता वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील नुल या गावातील 9 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. तसेच तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, कोरोना वरील उपचार सुरू असतानाच संबंधित मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एवढ्या लहान वयाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात असतानाच कोल्हापूरमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज असल्याचं मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More